
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटीचा आज दुसरा दिवस आहे. हिंदुस्थानने उपहारापर्यंत 4 बाद 138 धावा केल्या आहेत. हिंदुस्थानचा संघ 21 धावांनी पिछाडीवर असून सध्या रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल मैदानात शड्डू ठोकून उभे आहेत.
पहिल्या दिवशी हिंदुस्थानने पाहुण्या संघाला 159 धावांमध्ये गुंडाळले होते. त्यानंतर दिवसअखेर यशस्वी जैस्वाल याची विकेट गमावून 1 बाद 37 अशी मजल मारली होती. दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानने पहिल्या तासभर एकही विकेट गमावली नाही. केएल राहुल आणि वाशिंग्टस सुंदर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांचा यशस्वी सामना केला. या दरम्यान राहुलने कसोटी क्रिकेटमधील चार हजार धावांचा टप्पाही पार केला.
Milestone Unlocked ✅
4⃣0⃣0⃣0⃣ Test runs and counting for the elegant KL Rahul 👌
He also brings up a crucial 5⃣0⃣-run stand with Washington Sundar 🤝
Updates ▶️ https://t.co/okTBo3qxVH #TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @klrahul pic.twitter.com/D2VEURmVhF
— BCCI (@BCCI) November 15, 2025
दुसऱ्या विकेटसाठी सुंदर आणि राहुलमध्ये अर्धशतकीय भागिदारी झाली. दोघेही मोठी धावसंख्या करतील असे वाटत असताच आधी सुंदर 29 आणि नंतर राहुल 39 धावांवर बाद झाला. सुंदर बाद झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. चौकार ठोकत त्याने उत्तम सुरुवात केली. मात्र मानेमध्ये वेदना होऊ लागल्याने त्याने मैदान सोडले.
नेमकं काय घडलं?
शुभमन गिल याने सुरुवातीचे दोन चेंडू सावधपणे खेळून काढले. मात्र तिसऱ्या चेंडूवर त्याने बॅकवर्ल्ड स्क्वेअर लेगवरून चौकार ठोकला. हा फटका मारल्यानंतर गिल वेदनेने कळवळला आणि त्याने स्वत:ची मान पकडली. हे पाहताच फिजिओंनीही मैदानात धाव घेतली. प्राथमिक उपचारानंतर गिल तूर्तास फलंदाजी करू शकणार नाही हे जाणवताच त्याला मैदानातून बाहेर नेण्यात आले.
उपहाराआधी पंत बाद
दरम्यान, उपहारासाठी काही षटके बाकी असताना ऋषभ पंतही बाद झाला. त्याने 24 चेंडूत 27 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले.
Lunch on Day 2 🍲#TeamIndia trail South Africa by 2⃣1⃣ runs in the 1⃣st innings.
Ravindra Jadeja and Dhruv Jurel will resume proceedings after the break.
Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/DNHwKzCAAB
— BCCI (@BCCI) November 15, 2025

























































