
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. पुढील अर्थसंकल्पीय अधिकेशन 28 फेब्रुवारीपासून नागपूर येथे सुरू होईल. या अधिवेशनात 28 बिले मांडण्यात आली, तर 24 विधेयके मंजूर करण्यात आली. त्याचप्रमाणे 31 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या या अधिवेशनात मंजूर करण्यात आल्या. 5 दिवसांच्या या अधिवेशनात महिलांवरील अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी कठोर शिक्षेच्या तरतुदी असणारे ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले. विद्यापीठ सुधारणा विधेयकही मंजूर करण्यात आले. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा महत्त्वपूर्ण ठरावही एकमताने मंजूर करण्यात आला.



























































