एनआयएचे प्रमुख सदानंद दाते पहलगाममध्ये तपासाचा आढावा घेतला

एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेचे प्रमुख सदानंद दाते आज पहलगाममध्ये दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्षदर्शींना घटनास्थळी नेऊन तपासाचा आढावा घेतला. त्यांच्याकडून तेव्हाची स्थिती जाणून घेतली, अशी माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली.

दाते यांनी वरिष्ठ अधिकाऱयांशी तपासाबाबत चर्चा केली. एनआयएने तपासाचा वेग वाढवला असून आतापर्यंत तब्बल अडीच हजार नागरिकांचे जबाब नोंदवले आहेत. वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी 15 एप्रिल रोजी बैसरनसह कमीत कमी चार ठिकाणांची रेकी केली होती. दहशतवाद्यांना मदत करणायांना अनेकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी दिली.