
सामना प्रतिनिधी । शिरूर आनंतपाळ
लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत 238 निलंगा विधानसभा मतदारसंघात मतदारसंघ स्तरावरील सुलभ निवडणुका करिता दिव्यांग मतदारांसाठी विशेष समितीची स्थापन करण्यात आली आहे.सदर समितीमध्ये उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी हे अध्यक्ष असून तीनही तालुक्याचे तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद ,गटविकास अधिकारी पंचायत समिती, उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग,व महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघ चे प्रतिनिधी हे सदस्य म्हणून समावेश करण्यात आले आहेत.
सदर समितीची पहिली बैठक दिनांक 20 मार्च दोन 2019 रोजी उपविभागीय कार्यालयात घेण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिव्यांग मतदार वयोवृद्ध व आजारी व्यक्तींना मतदान केंद्रावर घेऊन जाणे त्यांचे मतदान प्रक्रिया पूर्ण करून घेणे व त्यांना परत त्यांच्या घरी सोडण्यासाठी निवडणूक आयोगातर्फे वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. सदर वाहनाची व्यवस्था ही शहरी भागात मुख्याधिकारी व ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांनी नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावरील अपंग कल्याणकारी ता उपलब्ध असलेल्या पाच टक्के निधी मधून करायचे आहे. तसेच दिनांक 18 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रिया मध्ये दिव्यांग मतदारांना सहाय्य करण्यासाठी तसेच सर्व मतदारांना रांगेमध्ये उभे करण्यासाठी एक मतदान केंद्रावर 10 मतदान दुत म्हणून 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांची नेमणूक करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. नियुक्त केलेले मतदान दूत हे उद्याचे भावी मतदार असल्यामुळे त्यांनाही मतदान प्रक्रियेचे महत्त्व समजून लोकशाही बळकट होण्यासाठी मदत होईल.
बैठकीच्या निमित्ताने सर्व दिव्यांग मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी शंभर टक्के मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवावा व जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी राबविण्यात येणारे ” मिशन डिस्टिंक्शन” हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलंगा विकास माने यांनी केले आहे.
























































