नीरव मोदीची 330 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईसह लंडन येथील घरांचा समावेश

nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेला तब्बल १४ हजार कोटींना गंडवून लंडनमध्ये पळालेल्या नीरव मोदी याची ३३० कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली असून, यात मुंबई, लंडन आणि संयुक्त अरब अमिराती येथील आलिशान घरांचादेखील समावेश आहे.

गेल्या वर्षी नीरव मोदी याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित केले होते. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने त्याची दोन हजार ३४८ कोटींची संपत्ती जप्त केल्यानंतर आणखी काही मालमत्ता जप्त करण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ‘ईडी’ने मुंबईतील वरळी येथील ‘समुद्र महल’ येथील फ्लॅट, अलिबागमधील फार्महाऊस, राजस्थान जैसलमेरमधील मॉल, लंडन व यूएईमधील फ्लॅट जप्त केले आहेत.

२३०० किलो सोनेही आणले
‘ईडी’ने मोदी आणि चोक्शी संबंधित कंपन्यांमधून दोन हजार ३०० किलो सोनेही हिंदुस्थानात आणले आहे. ज्याची मूळ किंमत एक हजार ३५० कोटी इतकी आहे. हे सर्व सोने हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक वंâपनीच्या गोदामात ठेवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या