मी नैराश्यात, जामीनासाठी नीरव मोदीचा न्यायालयात कांगावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
nirav-modi-new

पंजाब नॅशनल बँकेत चौदा हजार कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी लंडनमधील तुरुंगात कैद असलेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने पुन्हा एकदा न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्याने आपण नैराश्यात गेलो असून सतत भीती वाटत असल्याचा कांगाव केला आहे. नीरव मोदीच्या वकिलाने न्यायालयात याबाबत अर्ज दाखल केला आहे.

नीरव मोदी याला पीएनबी बँक घोटाळ्या प्रकरणी लंडन येथे 19 मार्च रोजी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तेथील वेंडस्वर्थ कारागृहात कैद आहे. सध्या नीरव मोदी न्यायालयीन कोठडीत आहे. आतापर्यंत नीरव मोदीने चार वेळा जामीनासाठी अर्ज केला असून त्याचे सर्व जामीन अर्ज वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयाकडून फेटाळण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळेस त्याने तब्येतीचे व मानसिक आजाराचे कारण पुढे करत जामीन मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.