नीरव मोदीची आत्महत्येची धमकी

261

हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्याचा आदेश कोर्टाने दिला तर मी आत्महत्या करेन, अशी धमकी पीएनबी घोटाळय़ातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याने बुधवारी वेस्टमिंस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात दिली. नीरवच्या या वक्तव्यावरून फरार होण्याचा त्याचा विचार असल्याचे हिंदुस्थानद्वारे वकिली करणारे ऍड. जेम्स लेव्हीस यांनी स्पष्ट केले.

बुधवारी नीरव मोदीचा जामीन अर्ज सलग पाचव्यांदा फेटाळण्यात आला. त्याच वेळी न्यायमूर्ती एम्मा अबर्थनॉट यांनी नीरवच्या अर्जातील त्याच्या मानसिक स्थितीबद्दलची माहिती हिंदुस्थानातील प्रसारमाध्यमांमध्ये लीक झाल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. यामुळे येथील न्यायालयाचा हिंदुस्थान सरकारवरील विश्वास कमी होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. नीरव मोदी गेल्या 7 महिन्यांपासून लंडनच्या वाण्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे.

आपली प्रतिक्रिया द्या