
नाशिकमध्ये होणाऱया कुंभमेळय़ासाठी तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. त्याला पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. त्यावरून भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी आज वादग्रस्त विधान केले. वृक्षतोडीला विरोध करणारे पर्यावरणवादी ईदच्या दिवशी बकरी कापायला का विरोध करत नाहीत, असे नितेश राणे बरळले.
नाशिकमध्ये पुढच्या वर्षी होणाऱया सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी देशभरातील साधुसंत येणार आहेत. त्यांच्या व्यवस्थेसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बनवले जाणार असून त्यासाठी सुमारे दोन हजार झाडे तोडली जाणार आहेत. त्याला पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याबद्दल भाष्य करणाऱया नितेश राणे यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.




























































