कोरोना संकटातही बिहारमध्ये राजकीय महाप्रयोग, मुख्यमंत्री नितीशकुमारही करणार ऑनलाईन रॅली

629

विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बिहारमध्ये भाजप, आरजेडी, आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या `जेडीयु’ ने राजकीय आडाखे आखण्यास सुरुवात केली आहे. कोरोना संकटातही भाजपकडून `व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन करून मतांची भूक भागविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. भाजपच्या या रॅलीला `गरीब अधिकार दिवस’ या कार्यक्रमाचे आयोजन करून `आरजेडी’कडून उत्तर दिले जाणार आहे.

नितीशकुमार यांच्या नेतृत्वात जेडीयू सोबत सत्तेत असणार्‍या भाजपने 9 जून रोजी अमित शहांच्या प्रमुख उपास्थितीत बिहारमध्ये `व्हर्च्युअल रॅली’चे आयोजन केले होते. मात्र रॅलीच्या तारखेत अचानक बदल करून दोन दिवस आधी म्हणजे 7 जूनला आता हा मेळावा घेण्यात येणार आहे. `आरजेडी’च्या `गरीब अधिकार दिवस’ या कार्यक्रमाला घाबरून भाजपने आपल्या रॅलीच्या तारखेत बदल केल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला आहे. डिजीटल प्रचाराच्या माध्यमातून भाजप आपली राजकीय भूक भागविण्याचा प्रयत्न करत आहे.

नितीशकुमार साधणार ऑनलाईन संवाद

भाजप पाठोपाठ जेडीयू नेते मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी देखील ऑनलाईन रॅलीच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याचे नियोजन केले आहे. 7 ते 13 जून या कालावधीत ते फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून ते प्रत्येक जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या