गजब आदमी है भाई…, हार घालताना रोखल्यामुळे नितीश कुमार भडकले

मुझफ्फरपूरमधील प्रचार सभेत उमेदवाराला हार घालण्यापासून रोखल्यामुळे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आपल्याच खासदारावर चिडले. गजब आदमी है भाई, हात काहे पकडते हो… असे म्हणत त्याला सुनावले. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यावरून नितीश कुमार यांच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नितीश कुमार औराई मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार रमा निषाद यांच्या प्रचारासाठी मुझफ्फरपूर येथे गेले होते. तिथे त्यांनी निषाद यांना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. मात्र हार गळय़ात घालण्याऐवजी हातात द्या, असे तिथे उपस्थित असलेले खासदार संजय झा हे नितीश यांना सांगू पाहत होते. त्यामुळे नितीश भडकले आणि त्यांनी हार गळय़ातच घातला. त्यानंतर सर्वांसमोरच खासदार झा यांना सुनावले.