
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मंत्री नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ‘कमळ किंवा धनुष्यबाण चिन्ह दिसलं की लगेच निधी देतो, पण चुकून मशाल चिन्ह निघालं, तर असलेला निधीही कमी करून टाकतो,’ असे नितेश राणे म्हणाले.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक एकतर्फी होत असल्याचा दावा करत नितेश राणे म्हणाले की, ‘प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का करायचं, असा प्रश्न लोकांना पडला आहे. विरोधात कोण लढतंय याची आम्हाला कोणतीही चिंता नाही. निवडणुकीनंतर पुन्हा निधीसाठी त्यांना आमच्याकडेच यावं लागणार आहे, असे नितेश राणे म्हणाले. ‘फोंडा मतदारसंघात निधी कमी पडू देणार नाही. मला या मतदारसंघात नंबर वन लीड द्या, पहिला एक कोटी रुपयांचा निधी देतो,’ अशी घोषणा त्यांनी केली.
…म्हणून आमचे सरपंच झाले
ग्रामपंचायत निवडणुकीत सगळ्या सरपंचांना सांगितलं होतं, आम्हाला ग्रामपंचायत द्या, नाहीतर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. त्यामुळे सगळे सरपंच पटापट आमचे झाले,’ असा दावा नितेश राणे यांनी केला.






























































