
कॉँग्रेसचे माजी आमदार पैलास गोरंटय़ाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाशी युती नको, अशी मागणी गोरंटय़ाल यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच केली आहे.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेले माजी आमदार गोरंटय़ाल यांना भाजपने गळाला लावले. गोरंटय़ाल म्हणाले, मनपात जालन्यात 40 जागा येतील, शिंदे गटासोबत युती करू देऊ नका, अशी फडणवीस यांना गळ घातलीये. जालन्यात भाजपचा महापौर बसवायचाय. शिंदे गट सोडून सगळय़ांना सोबत नेणार.
माझ्याकडे खोतकरांच्या दहा प्रकरणांच्या फाईल्स मिंधे गटाचे अर्जुन खोतकर यांना गोरंटय़ालयांनी लक्ष केले. गँगस्टरमध्येही नियम असतात की फॅमिलीवर जायचं नाही, पण हा माझ्या फॅमिलीवर गेला आता मी यांच्या फॅमिलीवर जाणार. माझ्याकडे याच्या 10 प्रकरणांच्या फाईल्स आहेत, त्यांची आई कासाबाईच्या नावाने फ्लॅट, हिरानंदानीला घर घेतलं, 22 वर्षांचा जावई आहे तो अंडर 19 खेळला. या माणसामागे दोनदा ईडी लावली, असे गोरंटय़ाल म्हणाले.
खरा गद्दार कोण? खोतकरांना सवाल
काँग्रेसने आमदारकी देऊनही गद्दारी केली, अशी टीका शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी केली होती. यावर गोरंटय़ाल म्हणाले, खोतकर यांनी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. नारायण राणेंसोबत गेले, मग खरा गद्दार कोण, असा सवाल गोरंटय़ाल यांनी केला.


























































