
सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांना हिंडेनबर्ग प्रकरणात लोकपालांनी क्लीन चिट दिली आहे. हिंडेनबर्ग प्रकरणात बुच यांच्याविरोधात चौकशीचे आदेश देण्यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही, असे स्पष्ट करत लोकपालांनी हा निर्णय दिला.
माधवी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अदानी समूहातील गुंतवणुकीशी संबंधित एका फंडात मोठी रक्कम गुंतवली. सल्लागार सेवा शुल्काच्या नावाखाली एम अँड एम तसेच ब्लॅकस्टोन इंकसारख्या पंपन्यांशी व्यवहार केले गेले. भाडय़ाच्या उत्पन्नाच्या नावाखाली वोकहार्टसोबत व्यवहार केला. 207 ते 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत आयसीआयसीआय बँकेचे ईएसओपी विपून गैरमार्गाने नफा कमावला. एम अँड एम तसेच ब्लॅकस्टोन इंक यांच्याशी संबंधित बाबींपासून स्वतःला दूर ठेवण्यात आले, अशा बुच यांच्यावरील पाच मुख्य आरोपांची लोकपालांमार्फत चौकशी सुरू आहे.