साईबाबा मंदिरात हार, फुले नेण्यास परवानगी

साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भाविकांनी खरेदी केलेल्या हार–फुलांची पावती प्रवेश करताना दाखविणे बंधनकारक असणार आहे.

2 मे रोजी आलेला धमकीचा मेल आणि हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार, फुले, गुच्छ, प्रसाद, शाल इत्यादी साहित्य नेण्यास बंदी घातली होती.