आयपीएलमध्ये हिंदुस्थानींचा भाव घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

आयपीएलच्या आगामी मोसमासाठी जयपूर येथे 18 डिसेंबरला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. यामध्ये हिंदुस्थानी क्रिकेटपटूंपेक्षा परदेशी खेळाडूंचा भाव चढा दिसत आहे. ब्रॅन्डन मॅक्कलम, ख्रिस वोक्स, लसिथ मलिंगा, शॉन मार्श, कोलिन इनग्राम, कोरे ऍण्डरसन, अँजेलो मॅथ्यूज आणि डी शॉर्ट या परदेशी खेळाडूंची मूलभूत किंमत दोन कोटी ठेवण्यात आली आहे. जयदेव उनाडकटसाठी दीड कोटी आणि युवराज, शमी यांची मूलभूत रक्कम एक कोटी ठेवण्यात आली आहे.