सध्याच्या धकाधकीच्या जीवनात वर्क लाइफ आणि पर्सनल लाईफ यांची सांगड घालणे कठीण जातंय. त्यामुळे अनेक देशांमध्ये वार्ंकग कल्चर सुधारण्याची मागणी होतेय. अशातच ऑस्ट्रेलियात कर्मचाऱयांच्या हितासाठी एक कायदा करण्यात आलाय. 28 ऑगस्टपासून फेयर वर्क अमेंडमेंट ऍक्ट 2024 लागू केला जाणार आहे. या कायद्यानुसार, कर्मचाऱयाला डय़ुटी संपल्यानंतर बॉसच्या कॉलला उत्तर देण्याचीही गरज राहणार नाही. याशिवाय कर्मचाऱयाला डय़ुटीनंतर कोणतेही कार्यालयीन काम करू दिले जाणार नाही. डय़ुटी संपल्यानंतर कोणत्याही अधिकाऱयाने आपल्या कर्मचाऱयावर कोणतेही काम करण्यास भाग पाडले किंवा दबाव टाकला तर त्याला मोठी भरपाई द्यावी लागेल. ऑस्ट्रेलियातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचारी संघटना अनेक दिवसांपासून देशातील कार्यसंस्कृती सुधारावी, अशी मागणी करत आहेत. याशिवाय देशातील बॉस संस्कृती सुधारून वर्क-लाइफ समतोल साधला जावा, अशी मागणीही सातत्याने केली जात होती.
… तर बॉसवर कारवाई
या कायद्यानुसार आता बॉस कोणत्याही कर्मचाऱयाला डय़ुटीनंतर कोणत्याही वैध कारणाशिवाय कॉल करू शकणार नाही. त्याला कोणत्याही ईमेलला उत्तर देण्यास किंवा कोणतीही कागदपत्र फाइल अपडेट करण्यास सांगितले जाणार नाही. एखाद्या कर्मचाऱयाने बॉसच्या विरोधात तक्रार केल्यास चौकशीनंतर त्या बॉसवर कारवाई केली जाईल.