
मुंबईतील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महत्त्वाचे पाच रस्ते पार्किंगमुक्त करण्यात येणार आहेत. यामध्ये ‘बेस्ट’ थांब्याच्या दोन्ही बाजूला 50 मीटर परिसरात ‘नो पार्किंग’ची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. येत्या 30 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामध्ये बेकायदा पार्किंग केल्यास 7 जुलैपासून सुरू करण्यात आलेला दहा हजारांपर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.
मुंबईतील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी दक्षिण मुंबईतील महर्षी कर्व मार्ग, एस. व्ही. रोड, गोखले रोड, न्यू लिंक रोड, एल. बी. एस. हे महत्त्वाचे पाच मार्ग पार्किंगमुक्त केले जाणार आहेत. यामध्ये दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लालबहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सुमारे 14 किमीच्या अंतराच्या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ‘पार्किंगमुक्त’ करण्यात येणार आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्याचे आदेश पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सहआयुक्त, उपायुक्तांना दिले आहेत.
येथे होणार पार्किंगमुक्त रस्ते
दक्षिण मुंबईतील चर्चगेट स्थानक ते ऑपेरा हाऊस या दरम्यानच्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या महर्षी कर्के मार्गाकर, दादर परिसरातील गोखले मार्गाकर पोर्तुगीज चर्च ते एल. जे. जंक्शन, पूर्क उपनगरातील लालबहादूर शास्त्राr मार्गाकर कल्पतरू ते निर्मल लाइफस्टाइल या दरम्यानच्या सुमारे दीड किलोमीटर अंतराकर, पश्चिम उपनगरातील स्कामी किकेकानंद मार्गाकर जुहू एअरपोर्ट ते ओशिकरा नदीपर्यंतच्या सहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत, ‘न्यू लिंक रोड’कर डी. एन. नगर मेट्रो स्टेशन ते ओशिकरा नदीपर्यंतच्या सुमारे दोन किलोमीटरच्या अंतराकर ‘नो पार्किंग’ची अंमलबजावणी केली जाणार आहे.



























































