ईएमआय थकला; नो टेन्शन!

तुमच्या ईएमआय थकला तरी  बँका आता तुमच्याकडून मनमानी पद्धतीने दंड वसूल करू शकणार नाहीत. कर्जदारांना अवाच्या सवा दंड आणि व्याजदरांपासून वाचवण्यासाठी आरबीआयने प्रस्ताव आणला आहे.

नव्या प्रस्तावानुसार ईएमआय थकला तर त्याच्यावरील दंड शुल्काच्या स्वरूपात घ्यावा, चक्रवाढ व्याजाच्या रूपात वसूल करू नये, अशी तंबी आरबीआयने बँकांना दिली आहे. सरासरी सर्वच बँका हप्ता थकला की त्यावर पेनल्टी म्हणून वार्षिक व्याजाच्या तुलनेत 1 ते 2 टक्के दंड आकारतात.