मुंबईत येणाऱया विमान प्रवाशांना दिलासा, दोन डोस घेतलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण करून मुंबईत येणाऱया देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांना आता आरटीपीसीआर चाचणीतून वगळण्यात आले आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रात्री उशिरा याबाबतचे परिपत्रक जारी केले.