नशेत मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा विकृत आरोपी डॉक्टरच्या शिक्षेला स्थगिती नाही

दारूच्या नशेत आपल्या सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱया हृदयरोगतज्ञाची विकृत म्हणून संभावना करत त्याच्या शिक्षेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. दारू प्यायल्यावर माणूस हैवान बनतो, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या डॉक्टरला कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. शिक्षेतून दिलासा मिळावा याकरिता या डॉक्टरने न्यायालयात याचिका केली होती.