दानपेट्या चोरणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंदिरातील दानपेटीतील रकमेवर डल्ला मारणाऱ्या तिघांना भोईवाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी तिघांकडून चोरीच्या दोन दानपेट्या व रोकड जप्त केली आहे.

दादर पूर्वेकडील नायगाव येथील सदानंद मार्गावरील व्याघ्रेश्वर महादेव मंदिरातील दोन दानपेट्या चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोनाली निमसे व पथकाने सीसीटीव्ही तपासले असता आरोपी कोण ते निष्पन्न झाले. त्यानंतर आरोपींना तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून पकडण्यात आले. त्यांच्याकडून दोन दानपेट्या, १६ हजारांची रोकड आणि एक अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. रोहित खंडागळे, आदित्य प्रसाद आणि साहिल शेख अशी या तिघांची नावे आहेत. यातील एकावर चोरीचे चार गुन्हे दाखल असून अन्य दोघांवरदेखील गुन्हे नोंद आहेत.

.