40 वर्षांपूर्वी ‘या’ पुस्तकात करण्यात आली होती कोरोनाची भविष्यवाणी!

3316

फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नोस्ट्रदेमसने सुमारे 465 वर्षांपूर्वी चीनमधील कोरोना व्हायरसची भविष्यवाणी केली होती. कविता आणि सांकेतिक भाषेत करण्यात आलेल्या या भविष्यवाणीत चीनच्या समुद्राजवळील एका शहरात जगावर रोगराईचा फास आवळणाऱ्या रोगाचा उदय होईल, असे भाकित करण्यात आले होते. या भविष्यवाणीचा संबंध कोरोना व्हायरसशी जोडण्यात येत आहे. तसेच 40 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका पुस्तकात या व्हायरसबाबत उल्लेख सापडले आहेत. सोशल मीडियावर या पुस्तकातील काही भाग शेअर करण्यात आला आहे. एका पुस्तकातील गोष्टी अशा प्रत्यक्षात उतरतील, याची कल्पनाच करता येत नसल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 1900 जणांचा बळी गेला आहे. तर 72 हजार जणांना याचे संक्रमण झाले आहे. तर या रोगाचा फैलाव 25 देशांमध्ये झाला आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध भविष्यवेत्ता नोस्ट्रदेमससह अनेक भविष्यवेत्त्यांनी या संकटाची भविष्यवाणी शेकडो वर्षांपूर्वीच केली होती. तसेच 40 वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकातही याबाबतचे उल्लेख आढळतात. 1981 मध्ये थरारक कादंबरी ‘द आइज ऑफ डार्कनेस’ मध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पुस्तकात ‘वुहान 400’ नावाच्या विषाणूचा उल्लेख करण्यात आला आहे. एका प्रयोगशाळेत जैविक शस्त्रे बनवण्याच्या प्रयत्नात एका भयानक व्हायरसची निर्मिती होते. त्यामुळे जगात थैमान माजते, असा उल्लेख डियान कूंट्ज यांनी या कादंबरीत केला आहे. ट्विटरवर या पुस्तकाचा काही भाग शेअर करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर या कादंबरीची चर्चा होत आहे. एका यूजरने ‘वुहान 400’ नावाच्या विषाणूचा उल्लेख असलेला भाग शेअर केला आहे.

आपण सध्या एका वेगळ्याचा जागतिक संकटाशी मुकाबला करत आहोत. अशा परिस्थितीत 40 वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या कादंबरीतील घटना प्रत्यक्षात घडत आहे, हे अकल्पनीय आहे, असे या यूजरने म्हटले आहे. अशा प्रकारच्या कादंबऱ्या वाचताना आपण थरार अनुभवतो. मात्र, अशा घटना प्रत्यक्षात घडू लागल्या, तर त्याचे किती भयावह परिणाम होतात, ते आपण पाहत आहोत, असेही त्याने म्हटले आहे. 40 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या कादंबरीतील घटना प्रत्यक्षात जशाच्या तशा घडत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनीही या पुस्तकातील एक भाग शेअर केला आहे.

कोरोना व्हायरसबाबत चीन सत्य लपवत असल्याचा सशंय जगभरातून व्यक्त होत आहे. चीनच्या एका प्रयोगशाळेतून या व्हायरसची निर्मिती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीन जैविक शस्त्रे बनवण्याचा प्रयत्नात असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, चीनने हे सर्व आरोप फेटाळून लावत कोरोना व्हायरस हा नैसर्गिक आपत्ती असल्याचा दावा केला आहे. मात्र, शतकांपूर्वीची भविष्वेत्त्यांची भाकिते आणि या कादंबरीतील उल्लेख याचा संबंध कोरोनाशी जोडण्यात येत आहेत. सध्या सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे 40 वर्षापूर्वीची कादंबरी प्रकाशात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या