
1 मे 2025 पासून आता एटीएममधून पैसे काढणे महाग झाले आहे. आरबीआयच्या नव्या नियमानुसार, आता कोणत्याही बँकेच्या ग्राहकांना आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्यातून केवळ पाच वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत. मोफत मर्यादा संपल्यानंतर ग्राहकांना प्रत्येक व्यवहारावर 23 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. जर ग्राहकाने पैसे काढण्यासाठी दुसऱ्या बँकेचे एटीएम वापरले तर मेट्रो शहरात केवळ 3 व्यवहार मोफत असून नॉन मेट्रो शहरात जास्तीत जास्त 5 व्यवहार मोफत आहेत.