व्हॅट्सअॅपवर किती वेळा मेसेज फॉरवर्ड केला हे समजणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॅट्सअॅपवर एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला, हे आता आपल्याला लवकरच समजणार आहे. फॉरवडींग इन्फो आणि फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड अशा दोन फिचर्सद्वारे ही सुविधा उपलब्ध होईल. फॉरवडींग इन्फोचा पर्याय ग्राहकाला मेसेज इन्फो सेक्शनमध्ये दिसेल. या ठिकाणी ग्राहक जाणून घेतील की, मेसेज किती वेळा फॉरवर्ड केला आहे. मात्र ही माहिती आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा एखादा मेसेज आपण इतरांना फॉरवर्ड करू. यानंतर आपल्याला मेसेज इन्फोमध्ये दिसेल की, किती वेळा सदर मेसेज फॉरवर्ड करण्यात आला आहे.

एखादा मेसेज कधीतरी पाठविलेला म्हणजे फ्रिक्वेंटली फॉरवर्डेड अशा टँगसोबत आला की याचा अर्थ असा की, कमीत कमी चार वेळा यापूर्वीच हा मेसेज फॉरवर्ड केलेला आहे. हे फिचर ग्राहकांसाठी कधी जारी करण्यात येईल याची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.