‘एनआरसी’ची बंगालमध्ये अंमलबजावणी होणार नाही! ममतादीदींचे शहांना आव्हान

1289

एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोध कायम आहे. काही लोक एआरसीच्या नावाने लोकांना भडकावत आहेत. बाहेरून आलेल्या नेत्यांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. एआरसीविरोधात लढणाऱ्या, तुमची बाजू मांडणाऱ्यांवर विश्वास ठेवा. एआरसी पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे घाबरून जावू नका, असे ममता बॅनर्जी राज्यातील नागरिकांना उद्देशून म्हणाल्या. त्यामुळे संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याची घोषणा करणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांना ममतादीदींनी एकप्रकारे आव्हानच दिल्याची चर्चा रंगली आहे.

याआधी बुधावरी राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘एनआरसीच्या आधारे नागरिकांची ओळख निश्चित केली जाईल तसेच याला संपूर्ण देशभरात लागू केले जाईल. कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही’, असे ते म्हणाले आहेत.

‘एनआरसी’ संपूर्ण देशभरात लागू करू, अमित शहांची राज्यसभेत घोषणा

यादीवरून वाद
याआधी आसाममध्ये एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा अंतिम अहवाल जारी झाला होता. या यादीत 3.11 कोटी नागरिकांना स्थान मिळाले, तर आसाममध्ये राहणाऱ्या 19.06 लाख नागरिकांना या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे मोठा वाद झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या