‘एनआरसी’ संपूर्ण देशभरात लागू करू, अमित शहांची राज्यसभेत घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
amit-shah

राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एनआरसीबाबत विरोधकांच्या आरोपांना बुधवारी प्रत्युत्तर दिले आहे. खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की, ‘एनआरसीच्या आधारे नागरिकांची ओळख निश्चित केली जाईल तसेच याला संपूर्ण देशभरात लागू केले जाईल. कोणत्याही धर्माच्या लोकांना यामुळे घाबरण्याचे कारण नाही.’ असे ते म्हणाले आहेत.

एनआरसीमध्ये धर्माच्या आधारे भेदभाव होण्याच्या शक्यतेला त्यांनी फेटाळून लावले आहे. यावर बोलताना ते पुढे म्हणाले की, ‘ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये देशातील सर्व नागरिक एनआरसी यादीमध्ये सामील होतील. तसेच एनआरसीमध्ये इतर धर्माच्या लोकांना यामध्ये समाविष्ट केले जाऊ नये अशी कोणतीही तरतूद नाही. कोणत्याही धर्माचे लोक एनआरसीमध्ये समाविष्ट होऊ शकतात.’,असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एनआरसी आणि नागरिक संशोधन विधेयक या दोन वेगळ्या प्रक्रिया

देशातील कोणत्याही नागरिकाचा धर्म कोणताही असतो, ते एनआरसी यादीत सामील होऊ शकता. तसेच एनआरसी ही वेगळी प्रक्रिया आहे आणि नागरिक संशोधन विधेयक ही वेगळी प्रक्रिया असल्याचे ते म्हणाले आहेत. यावरच काँग्रेस खासदार सय्यद नासिर हुसेन यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, ‘हिंदू, बुद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी निर्वासितांना नागरिकत्व मिळेल. यासाठी नागरिकत्व दुरुस्ती विधेयक स्वतंत्रपणे करण्यात आले आहे. जेणेकरुन या निर्वासितांना नागरिकत्व मिळू शकेल.’