मुंबईपेक्षा बंगळुरूमध्ये बिबटय़ांची संख्या वाढली

मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि लगतच्या परिसरात झालेल्या मागील वर्षी बिबटय़ांचे सर्वेक्षण करण्यात आले यामध्ये मुंबईत 54 बिबटय़ांचे अस्तित्त्व नोंदवले होते. बिबटय़ांवरील बंगळुरूचा सर्वेक्षण अहवाल समोर आला असून यामध्ये 85 बिबटय़ांची नोंद झाली. बिबटय़ांच्या आकडेवारीत बंगळुरूने मुंबईला मागे टाकले आहे.

महाराष्ट्र वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन सोसायटी इंडियाने  फेब्रुवारी ते जून 2024 दरम्यान केलेल्या पॅमेरा-ट्रप सर्वेक्षणात मुंबईत 54 बिबटय़ांचे अस्तित्व उघड झाले होते. कर्नाटकातील बंगळुरू शहराचा संजय गुब्बी आणि त्यांच्या होलेमत्ती नेचर फाउंडेशनच्या संशोधकाच्या पथकाने पॅमेरा ट्रप लावून बिबटय़ाचे सर्वेक्षण केले. तसेच त्यांच्या वर्तनाचा देखील अभ्यास केला. यावेळी शहर परिसरात 85 बिबटय़ांची नोंद करण्यात आली. यापैकी 54 बिबट बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानात नोंदवण्यात आले. तर उर्वरित 30 पेक्षा अधिक बिबटय़ांची संख्या दक्षिण, उत्तर आणि पूर्व बंगळुरूमधील जंगली भागात नोंदवण्यात आली. भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी सरकारने विद्यमान नैसर्गिक अधिवासांचे, विशेषतः दक्षिण बंगळुरूमधील, संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असेही या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

2019 मध्ये बनेरघट्टा राष्ट्रीय उद्यानामध्ये बिबटय़ांची संख्या 40 च्या आसपास होती, ती 2020 मध्ये 47 पर्यंत वाढली आणि आता 2025 मध्ये ती 54 वर पोहोचली आहे. ही वाढ मुख्यत्वे अधिवासाच्या प्रभावी संरक्षणामुळे झाली आहे. n तुरहल्ली, तुरहल्ली गुड्डा, बीएम कावल, यूएम कावल, रोएरिच इस्टेट, गोल्लाहल्ली गुड्डा, सुलिकेरे, हेसराघट्टा, मरासंद्रा, मांडुरू आणि बन्नेरघट्टा राष्ट्रीय उद्यानातील एकूण 282 चौरस किलोमीटर मिश्र अधिवासात 250 कॅमेरे वापरून संशोधकांनी 85 बिबटय़ांचे दस्तऐवजीकरण केले.