
2028 पर्यंत हिंदुस्थानातील अतिश्रीमंतांची संख्या 50 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. तसेच हिंदुस्थानात जपानपेक्षा चार पट जास्त श्रीमंत असतील. मॅककिन्से अँड कंपनीच्या अहवालानुसार, 2023 ते 2028 दरम्यान जगात अति-उच्च-निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या संख्येत हिंदुस्थानात सर्वात जलद वाढ होईल.
आशियामध्ये श्रीमंत लोकांमध्ये जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु 2023-28 दरम्यान जपानमधील श्रीमंत लोकांची संख्या 12 टक्क्यांनी वाढेल. यासोबतच, 2025 मध्ये हिंदुस्थानातील लक्झरी बाजारपेठ 15-20 टक्के दराने वाढेल, तर जपानमध्ये हा विकास दर 6-10 टक्के असू शकतो. हिंदुस्थानात 85,698 लोक राहतात ज्यांची मालमत्ता 10 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे, म्हणजेच सुमारे 87 कोटी रुपये. त्यांची संख्या जगातील एकूण श्रीमंतांच्या 3.7 टक्के आहे. उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत, आपण फक्त अमेरिका, चीन आणि जपानच्या मागे आहोत.