ओबीसी, धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य – मुख्यमंत्री

239
uddhav-thackeray

राज्यातील ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील समाजाने आपले प्रश्न योग्य व न्यायिक मार्गाने सोडवावेत. समाजाच्या विविध मागण्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिष्टमंडळाला दिले.

ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते. शिष्टमंडळाने या वेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई, आमदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाश शेडगे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या