
अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आज भाविकांसाठी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. अशाप्रकारे सुमारे 6 महिने चालणाऱ्या चार धाम यात्रेला औपचारीक सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी 1 हजारांहून अधिक भाविक गंगोत्रीला पोहोचले. तर 3 हजारांहून अधिक भाविक यमुनोत्रीला दर्शनासाठी पोहोचले. सकाळी सर्वात आधी गंगा मातेची पालखी मुखाभा येथून गंगोत्री धामला पोहोचली. राजपुताना रायफल्स बँडच्या सुरात गंगेची पूजा करण्यात आली. हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला.