उघड्यावर शौच करणाऱ्या कुटुंबांचे रेशन-पाणी बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या देशात उघड्यावर शौचास बसण्यास बंदी घातली असली तरी आजही अनेक लोकं ही बंदी झुगारून उघड्यावर शौचास बसतात. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने एक निर्णय घेतला आहे.

ओडिशातील ब्रहामपूर जिल्ह्यातील एका ग्राम पंचायतीने उघडय़ावर शौच करण्याचे आरोप असलेल्या 20 कुटुंबांचे रेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायतीच्या कठोर नियमांमुळे गौतमी गावात उघडय़ावर शौचाला बसणाऱया ग्रामस्थांची संख्या कमी झाली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने सरपंच सुशांत स्वेन यांचा कुटुंबांचे रेशन बंद करण्याचा निर्णय बेकायदा आणि मानवतेला धरून नसल्याचे म्हटले आहे. कोणाही नागरिकाला रेशन अथवा अन्नापासून वंचित ठेवणे कायद्याला धरून नाही, असे प्रशासनाने सांगितले आहे.