
ओडिशामधील बालेश्वर जिल्ह्यातील सुजानपूर गावात स्थानिक लोकांनी एका पिवळ्या कासवाला वाचवले आहे. दुर्मिळ जातीच्या या कासवाला नंतर वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. याबाबत माहिती देताना वन्यजीव वॉर्डन बी आचार्य म्हणाले की, ‘हा अत्यंत दुर्मिळ जातीचा कासव आहे. मी यापूर्वी कधीही असा कासव पाहिलेला नाही.’
Odisha: A yellow turtle was rescued by locals from Sujanpur village in Balasore district. It was later handed over to Forest Department officials. B Acharya, Wildlife Warden says, “This is a rare turtle, I have never seen one like this.” (19.07.20) pic.twitter.com/MWxjLzabyc
— ANI (@ANI) July 19, 2020
सामान्यतः कासव तपकिरी रंगात आढळतात. पिवळ्या रंगाचा असा दुर्मिळ कासव कदाचित कोणी पाहिला असेल. मात्र आता या पिवळ्या कासवाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बालेश्वर जिल्ह्यातील साजनपूर गावात कासवाची ही दुर्मिळ जाती दिसली आहे. हा कासव साजनपूर गावच्या वासुदेव महापात्रा नावाच्या शेतकर्याच्या जमिनीवर सापडला आहे. रविवारी वासुदेव आपल्या शेतात काम करत असताना त्यांनी हा कासव पाहिला. त्यांनी या कासवाला पकडून आपल्या घरी आणले. हा दुर्मिळ प्रकारातील कासव पाहण्यासाठी गावातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर वासुदेव यांनी हा कासव वनविभागाच्या ताब्यात दिला.
A rare yellow turtle was spotted & rescued in Balasore, Odisha yesterday.
Most probably it was an albino. One such aberration was recorded by locals in Sindh few years back. pic.twitter.com/ZHAN8bVccU
— Susanta Nanda IFS (@susantananda3) July 20, 2020
























































