जुने स्मार्टफोन वापरताय…सावधान! हॅकर्सकडून डेटाचोरी, हेरगिरीसाठी होतोय वापर

730

तुम्ही अजूनही जुनेच स्मार्टफोन वापरत असाल तर वेळीच सावध व्हा. डेटाचोरी आणि हेरगिरीसाठी जुने स्मार्टफोन हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती ‘द सन’च्या अहवालातून पुढे आली आहे. त्यामुळे ठरावीक कालावधीनंतर नवीन स्मार्टफोनचा पर्याय निवडण्याचा सल्ला सायबरसुरक्षा तज्ञांनी दिला आहे.

बाजारात सध्या नवनवीन स्मार्टफोन दाखल होत आहेत. आपापसातील स्पर्धांमुळे कंपन्या वेळोवेळी स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अपडेटस् देत असतात, परंतु बहुतेक कंपन्या एक किंवा दोन वर्षांनंतर जुन्या स्मार्टफोनचे अपडेटस् बंद करतात. अनेक ऍप्स फोनला सपोर्ट करीत नाहीत शिवाय ऍण्टी व्हायरसचीदेखील सुरक्षा फोनला मिळत नाही. याच कारणामुळे जुन्या स्मार्टफोनमधून फोटो, खासगी माहिती अशी डेटाचोरी करणे हॅकर्सना सहज शक्य होते, असे कम्पॅरिटेक डॉट कॉमचे सिक्युरिटी स्पेशालिस्ट ब्रायन हिगींस यांनी म्हटले आहे.

अशी होते डेटाचोरी

आयफोन किंवा ऍण्ड्रॉइडच्या लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट न करणारे फोन वापरून ग्राहक स्वतःची खासगी माहिती धोक्यात टाकत आहेत. हॅकर्स जुन्या स्मार्टफोन युजर्सना एसएमएस किंवा व्हॉटस्ऍपद्वारे लिंक पाठवतात. या लिंकवर क्लिक केल्यास संबंधित व्यक्तीची खासगी माहिती हॅकर्सला मिळते. प्ले स्टोअरवर अनेक थर्ड पार्टी ऍप्सद्वारेदेखील डेटाचोरी होत आहे, असे एजस्कॅनचे सायबर एक्सपर्ट सी. बर्न यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या