टिळकनगरमध्ये वृद्धेची निर्घृण हत्या, डोक्यात अनेक वार, गळा रस्सीने आवळला

712
murder

टिळकनगर येथील पेस्तम सागर मार्गावर असलेल्या एसआरए इमारतीत एका ७० वर्षीय वृद्धेच्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. डोक्यावर १४ वार आणि रस्सीने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.

जुना रेती बंदर येथे एसआरए बिल्डिंग असून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खोली नंबर १०६ येथे राहणाऱ्या सजनाबाई धोंडिबा पाटील (७०) या घरी बाथरूममध्ये पाय घसरून पडून डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत असल्याने त्यांचा पुतण्या आनंद पाटील याने त्यांना राजावाडी रुग्णालय येथे नेले. पण डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी जाऊन तपास केला असता सजनाबाई यांच्या डोक्यावरील जखमा बघता डोक्यावर धारदार हत्याराने १४ वार केल्याचे दिसून आले. तसेच त्यांचा गळा दोरीने आवळल्याचे व्रणही गळ्यावर दिसून आले. त्यांच्या घरातील कपाटातील सामानही अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले. त्यामुळे टिळकनगर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या