शहापूरमध्ये वृद्ध महिलेची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक

रस्त्यालगत असलेल्या झोपडीत झोप घेणाऱ्या एका वृद्ध महिलेची अज्ञात हल्लेखोराने हत्या केल्याची घटना शहापूर तालुक्यातील अल्याणी येथे काल गुरुवारी रात्री घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहापूर तालुक्यातील अल्याणी येथील रस्त्यालगत असलेल्या बसस्टँड जवळ शेख यांची झोपडी असून काही अंतरावर घर आहे. दररोज रात्री या झोपडीत झोपण्यासाठी समीर शेख यांची ६५ वर्षीय आजी अमिना शेख या झोपण्यासाठी जात असत. काल रात्री त्या झोपल्या असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या डोक्यात तीक्ष्ण वार करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी समीर शेख यांनी तक्रार केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरा विरोधात किन्हवली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार झालेल्या हल्लेखोराचा किन्हवली पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली.