… तर ऑलिम्पिक रद्द होणार

425

कोरोना विषाणूवर अद्याप लस आलेली नाही. तसेच कोरोना अद्याप नियंत्रणातही आलेला नाही. याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी नमूद केले की, कोरोना वाढतच चालला आहे. अशीच परिस्थिती पुढे सुरू राहिली तर टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षीही आयोजित करणे शक्य होणार नाही. 2022 सालामध्ये कतारमध्ये फुटबॉल वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. 2022 सालामध्ये हिवाळी ऑलिम्पिकचेही आयोजन करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत टोकियो ऑलिम्पिक पुढल्या वर्षी न झाल्यास ते थेट रद्द करण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या