नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज रात्री 8 वाजण्याच्या सुमारास राजभवन येथे जाऊन राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी जम्मू-कश्मीरमध्ये इंडिया आघाडीच्या सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांची भेट घेऊन काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि अपक्षांकडून मिळालेली पाठिंब्याची पत्रेही त्यांना सादर केल्याची माहिती ओमर अब्दुल्ला यांनी भेटीनंतर पत्रकारांना दिली. शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित करण्याची या वेळी विनंती करण्यात आल्याचे ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.