शाळा-कॉलेज सुरू ठेवायची की नाहीत? परिस्थिती पाहूनच निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागला आहे. ओमायक्रोन व्हेरिएंटची लागण झालेले रुग्णही सापडत असून या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज सुरू ठेवायची की नाहीत याविषयी पुढील परिस्थिती पाहूनच निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. काही मुलांनी दोन वर्षांत शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे, पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याने काही निर्णय घ्यावे लागतात, असे सांगून आदित्य ठाकरे यांनी नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर लोक काळजी घेताना दिसत नाहीत, याबद्दल चिंता व्यक्त केली. लोकांनी आरोग्याचे नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.