
सामना प्रतिनिधी । जळकोट
शिरुर ताजबंद – मुखेड राज्य महामार्गावर भरधाव वेगात निघालेली ओमिनी गाडी रस्ता सोडून पलट्या खात शेजारच्या शेतात जाऊन पडल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात ओमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीतून प्रवास करणारे प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
लातूरहून एक कुटुंबिय ओमिनी गाडीने सावरगाव (पीर ) ता. मुखेडकडे निघाले होते. राज्य महामार्गाने जाणारी भरधाव वेगातील ही ओमिनी गाडी उमरगा (रेतू ) पाटी (ता.जळकोट ) याठिकाणी येताच चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि रस्ता सोडून पलट्या खात ही गाडी बाजूच्या शेतात जाऊन पडली.
या दुर्घटनेचे वृत्त कळताच जळकोटचे पोलीस निरीक्षक मोहमद रफी पटेल यांनी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल घोगरे, पो. कॉ. रियाज देशमुख यांच्यासह अन्य सहकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून अपघाताची माहिती घेतली.

































































