हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बच विल्मोर हे दोघे 5 जूनपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले असतानाच एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ कंपनी चार जणांना स्पेसवॉकसाठी अंतराळात पाठवणार आहे. या मिशनचे नाव ‘पोलारिस डॉन’ आहे. यामध्ये अंतराळवीर पाच दिवस अंतराळात राहतील.
मोहीम अमेरिकेचे अब्जाधीश जेरेड इसाकमॅन यांनी प्रायोजित केली आहे. चारही जण 26 ऑगस्ट रोजी अंतराळात उड्डाण घेतील. यामध्ये जेरेड इसाकमॅन, त्यांचे मित्र स्कॉट पोटेट, तसेच सारा गिलीस व अन्ना मेनन या दोन महिला आहेत. ते फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशात झेपावतील. जेरेड इसाकमॅन, स्कॉट पोटेट, सारा गिलीस व अन्ना मेनन हे चौघे जण स्पेसएक्स क्रू ड्रगन पॅप्सूलमध्ये पाच दिवस राहणार आहेत.