
कुर्ला पश्चिम विभागात आरोग्य सेवेचा धडका सुरू होणार आहे. उद्या 21 जानेवारी रोजी कोहिनूर पंपाऊंडमधील एसआरए इमारत क्रमांक 10 येथे व सोमवार 23 जानेवारी रोजी नौपाडा येथील अमर सेवा संघ, अमर नगरमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेत आरोग्य शिबिरे होणार आहेत.
शिबिरांमध्ये मधुमेह, रक्तदाब, एचबीए1सी तपासणी करून मोफत औषध वाटप केले जाईल. मोफत दंत चिकित्सा, मोफत नेत्र चिकित्सा व अल्प दरात चष्मा वाटपही करण्यात येणार आहे. विभागप्रमुख, आमदार अनिल परब व विभाग संघटक संजना मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदिवली विधानसभा उपविभाग संघटक मनीषा नलवडे व ग्राहक संरक्षण कक्षाचे कृष्णा नलवडे यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे. या वेळी अश्विनी मते, अण्णा मलाई, भास्कर पाटील, साईनाथ कटके, चंदन सावंत, प्रशांत मोरे, पार्वती दारपुंडे, शुभम कांबळे, सचिन सकपाळ आदी उपस्थित राहतील. तसेच रविवार 22 जानेवारीला गावदेवी उत्कर्ष चाळ मैदानात महिलांसाठी हळदीपुंकू समारंभ होणार आहे.
कुरार गावात आज नॉनस्टॉप भजन स्पर्धा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा क्र. 36 आणि 37 च्या वतीने नॉनस्टॉप भजन स्पर्धा 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा उद्या, 21 जानेवारी रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत आमदार सुनील प्रभू यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर, तानाजी नगर, कुरार गाव, मालाड पूर्व येथे होणार आहे. उपविभागप्रमुख सुनील गुजर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी विभागप्रमुख–आमदार सुनील प्रभू, शिवसेना उपनेते, युवासेनेचे सरचिटणीस अमोल कीर्तिकर, माजी उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विभाग संघटक साधना माने, विधानसभा संघटक विष्णू सावंत, प्रशांत कदम, रिना सुर्वे, पूजा चौहान, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू आदी उपस्थित राहणार आहेत.





























































