विघ्नहर्ता करंडक एकांकिका स्पर्धा 13 ऑक्टोबरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या वतीने दहाव्या राज्यस्तरीय  मराठी खुल्या एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत परळच्या दामोदर नाट्यगृहामागे असलेल्या सहकारी मनोरंजन मंडळाच्या कार्यालयात ही स्पर्धा होणार आहे. अंतिम फेरी 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत दामोदर नाट्यगृहात होणार आहे. प्रवेश फी 1200 रुपये असून फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 2 ऑक्टोबर आहे. विजेत्यांना अनुक्रमे 21 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनयासाठीही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी  9870106923 किंवा 9757435399 या दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधता येईल.