मराठी एकांकिकाचे तेजस्वी पर्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रल्हाद जाधव 

बदलत्या काळाचे प्रतिबिंब कलेच्या सर्व माध्यमातून प्रतिबिंबित होत असते. निरोगी आणि समतोल समाजधारणेसाठी ते उपयुक्त असते. थिएटरही त्याला अपवाद नाही. सीमेवर लढणाऱया सैनिकांना रसद पुरवणारी एक मोठी यंत्रणा जशी पीछाडीवर कार्यरत असते तशीच कामगिरी या स्पर्धा व्यावसायिक रंगभूमीच्या मागे राहून करीत आहेत असे मला वाटते आणि त्या अनुषंगाने या एकांकिका स्पर्धा म्हणजे व्यावसायिक नाटकाची गंगोत्री असल्याचे पुनःपुन्हा अधोरेखित होत आहे.

मुंबईच्या उत्कर्ष सेवा मंडळाची ‘उंबरठा’ ही राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा रंगकर्मींच्या आणि रसिकांच्या चांगली ओळखीची आहे. स्पर्धेचे हे सतरावे वर्ष. या वर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरी 1, 2 आणि 3 नोव्हेंबरला रवींद्रच्या मिनी थिएटरमध्ये पार पडली. या फेरीतील 33 एकांकिका तसेच गेली तीन वर्षे विविध स्पर्धांतील अनेक एकांकिका पाहिल्यानंतर समकालीन मराठी एकांकिकेचे जे एक चित्र मनासमोर आले ते रसिकांसोर मांडण्याचा हा एक प्रयत्न.
बदलत्या काळाचे प्रतिबिंब कलेच्या सर्व माध्यमातून प्रतिबिंबित होत असते. निरोगी आणि समतोल समाजधारणेसाठी ते उपयुक्त असते. थिएटरही त्याला अपवाद नाही. सीमेवर लढणाऱया सैनिकांना रसद पुरवणारी एक मोठी यंत्रणा जशी पीछाडीवर कार्यरत असते तशीच कामगिरी या स्पर्धा व्यावसायिक रंगभूमीच्या मागे राहून करीत आहेत असे मला वाटते आणि त्या अनुषंगाने या एकांकिका स्पर्धा म्हणजे व्यावसायिक नाटकाची गंगोत्री असल्याचे पुनःपुन्हा अधोरेखित होत आहे.

विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार, धार्मिक आणि जातीय समीकरणांना विरोध, भ्रष्टाचार आणि ढिल्या राज्यव्यवस्थेवरील ताशेरे, परंपरा आणि शाश्वत मूल्यांची जोपासना, प्रसार माध्यमांच्या एकांगी आणि बधिर कार्यपद्धतीबाबतची चीड तसेच निखळ मनोरंजनाच्या अंगाने जाणाऱया या एकांकिका निकोप समाजधारणेसाठी काही मार्ग शोधू पाहत आहेत असे एक दिलासादायक सूत्र साऱया एकांकिकांमागे आढळून आले.अ बास्टर्ड पॅट्रिएट (दिशा थिएटर्स), डिस्टोपिया ( अंतर्नाद, मुंबई), कोकोरिको (खालसा महाविद्यालय), आर वुई ब्लाइंड? ( समर्थ अकादमी, पुणे ) या एकांकिकांनी लोकल आणि ग्लोबल अशा विशाल पार्श्वभूमीवर विविध संदर्भांचा हवाला देत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा जो पुरस्कार केला तो थक्क करून टाकणारा आणि जगायला बळ देणारा होता. कलर लेस (भवन्स चौपाटी), सच्चीमुच्ची बारीश (इंद्रधनू, मुंबई) आणि मी जात टाकली (अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, ऐरोली) या एकांकिकांनी जातीय आणि धार्मिक विद्वेषाच्या पार्श्वभूमीवर समाज कुठे चुकत आहे यावर टाकलेला प्रकाशझोत, तर भाग धन्नो भाग (एमसीसी महाविद्यालय), खेळ खुळा अंतरंग थिएटर्स), ठसका (रंगसंगती, मुंबई) या एकांकिकांनी भावना-संवेदनांच्या प्रेक्षकप्रिय मार्गाने रसिकांच्या मनाचा ठाव घेण्याचा केलेला प्रयत्न बहारीचा होता.

act2अर्धविराम (एम.डी. कॉलेज, मुंबई), लाजा (रंगवेडे, मुंबई), कॅलिडोस्कोप (अकॅडमी ऑफ थिएटर आर्टस्) या एकांकिकांनी शारीर आणि मानसिक पातळीवरील काही गुंतागुंतीच्या प्रांतात बुडी मारून अंतिम सत्याचा शोध घेण्याचा केलेला प्रयत्नही चोख आणि कलात्मक दृष्टीने उजवा ठरणारा होता. चिंपाट (बिर्ला महाविद्यालय) आणि बोभाटा (रंगोदय रूपांतर) यांनी बोचरा उपहास आणि व्यंगचित्रात्मक शैलीद्वारे एकूणच व्यवस्थेचे केलेले वस्त्र्ाहरण अंतर्मुख करणारे होते. 30, 60, 90 चे प्रमेय (अनुभुती आर्टस्, बदलापूर), ब्रमास्त्र्ा (एम.डी. नाटय़ांगण) आणि पत्रावळी(नाटय़ऋणी भवन्स) यांनी लोककलांचा आणि तत्सम संदर्भांचा आधार घेत केलेली आपापल्या विषयांची मांडणी अफलातून होती. त्यांनी एकाहून एक सरस सादरीकरण करत रंगभूमीवरील गुणदर्शनाची जणू नवी दिवाळी साजरी केली.

बिराड (कलांश थिएटर्स, रत्नागिरी), या एकांकिकेने भटक्या विमुक्तांचे गावकुसाबाहेरील रोजचे मरणप्राय जगणे अतिशय भेदकपणे सादर केले. वलय (पुणे) यांनी शर्वरी लहाडे लिखित ’द कट’ ही एक धाडसी एकांकिका सादर केली. सोमालियामध्ये स्त्र्ायांची सुंता करण्याची प्रथा आहे, त्या अनुषंगाने होणारे स्त्र्ााrशोषणाचे एक वेगळे अंग लोकांसमोर आणण्याचा त्यांचा धाडसी प्रयत्न प्रेक्षकांना अचंबित करून गेला. भ्रम-रात्र (स्वामी नाटय़ांगण डोंबिवली), नाटक बघा (फोर्थ वॉल, ठाणे), टेकडी (अश्वमेध थिएटर्स, नाशिक), एका स्वप्नगर्भाचा मृत्यू (विजिगिशा नाटय़ अकादमी नाशिक) दंगल (रंगमंच कामगार संघ), इबूगोगो (सत्कर्व वडाळा), रात्र झाली गोकुळी (निधी आर्टस्, मुंबई), संधी (अभिनव महामहाविद्यालय, भाईंदर) या आणि अशाच अन्य एकांकिकांनी आपल्या रंगकर्माचे आणि रंगधर्माचे कसोशीने
पालन केले.act3

मला या स्पर्धांतील एकांकिकातून लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अनेक कलावंतांचा उदय होताना दिसतो. स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावी अशी प्रज्ञा आणि प्रतिभा असणारी अनेक मुले आपल्या आजूबाजूला धडपडताना दिसत आहेत; पण काही अपवाद वगळता ते कलावंत, त्यांच्या त्या अफलातून एकांकिकांचे पुढे काय होते कळत नाही. त्यासाठी नेमके काय करायला पाहिजे हे सांगायला कोणी पुढे येत नाही. स्पर्धा संपली की लगेच ‘सारे काही शांत शांत’ होऊन जाते. थिएटरमधली स्पर्धा संपली की ती रसिकांच्या मनात सुरू झाली पाहिजे, तिचे उत्तरदायित्व समाजाने स्वीकारले पाहिजे, तरच पुढे काही तरी घडू शकेल, असा विचार या पार्श्वभूमीवर मनाशी आला. तसे मी आयोजकांना बोलूनही दाखवले. पण सद्यस्थितीत अशा प्रकारच्या स्पर्धा नियमितपणे सुरू राहणे हीच एक मोठी गोष्ट ठरली आहे हेही तितकेच खरे.

उत्कर्ष सेवा मंडळाचे अध्यक्ष शामराव चौगुले, कला विभागप्रमुख आदित्य कदम, खजिनदार सुधाकर कदम, सरचिटणीस कृष्णा कदम आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे निःस्पृहपणे या स्पर्धेचे आयोजन करीत आहेत. कला आणि क्रीडा अशा दोन्ही क्षेत्रांत संस्था अनेक उपक्रम राबवत असून तिच्या कार्याची प्रतिष्ठा सदैव वर्धिष्णू आहे हे आवर्जून नमूद करण्यासारखे आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या एकांकिका ः
अ बास्टर्ड पॅट्रिएट (दिशा थिएटर्स ऍण्ड ओमकार प्रॉडक्शन)
भाग धन्नो भाग (एमसीसी महाविद्यालय)
अर्धविराम (एम.डी. कॉलेज, मुंबई)
ठसका (रंगसंगती, मुंबई)
बिराड(कलांश थिएटर्स, रत्नागिरी)
पत्रावळी (नाटय़ऋणी भवन्स )
खेळ खुळा (अंतर्गत थिएटर्स, मुंबई)
[email protected]