पाच महिन्यांपासून फरार आरोपी पूर्णा पोलिसांच्या जाळ्यात

27

सामना प्रतिनिधी । पूर्णा

पाच महिन्यांपूर्वी पूर्णा येथून अपहरण करण्यात आलेला परळी येथील अजय भोसले खूनप्रकरणातील फरार असलेल्या एका मुख्य आरोपीला पुर्णा पोलिसांनी अटक केली आहे. गौतमनगर परळी वैजनाथ येथील अजय अशोक भोसले (16) वर्षे याचे अपहरण करुन त्याचा खून करुन मतदेह नागसेननगर परळी वैजनाथ झोपडपट्टीच्या आवारात पुरला होता. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यात तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. तर दोन आरोपी घटना घडल्यानंतर फरार होते.

या गुन्हयातील फरारी आरोपी चरणसिंग मंगलसिंग बावरी हा नागसेन नगर, गौतमनगर परिसरात असल्याची माहिती सोमवारी पूर्णा पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, जमादार नितीन वडकर, पोलीस कॉन्स्टेबल भिसे, लतीफ पठाण यांनी तातडीने परळी गाठली. परळीतील संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांना व पोलीस उपनिरीक्षक गोविंद एकीलवाले, पोलीस हवालदार नारायण भताने, सचिन सानप, दत्ता गित्ते यांना सोबत घेऊन त्यांनी आरोपी चरणसिंग मंगलसिंग बावरीला परळी शहरातील नागसेन नगर भागात छापा टाकून अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या