गणेशोत्सव मंडळांना मंडपाच्या परवानगीसाठी ‘‘एक खिडकी’ सुविधा 

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीतून ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑगस्ट 2023 पासून ही सुविधा मिळेल. या सुविधेमुळे गणेश मंडळांना पोलीस, वाहतूक पोलीस व मुंबई अग्निशमन दल यांच्याकडे वेगळे अर्ज करण्याची गरज नाही. विविध उत्सव अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजित केले जावेत आणि परवानगी प्रक्रिया अधिकाधिक सुटसुटीत व्हावी यासाठी  महापालिकेच्या वतीने ‘एक खिडकी’ पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळांना 13 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.