शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयडियल स्पोर्ट्स अॅपॅडमी, आत्माराम मोरे प्रतिष्ठान, स्वराज्य फाउंडेशन, आरएमएमएस आणि इन्स्टिटय़ूट फॉर चेस एक्सलंट यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनाच्या पार्श्वभूमीवर 20 जुलै ते 15 ऑगस्ट दरम्यान अखिल हिंदुस्थानी 14 वर्षांखालील शालेय मुलामुलींची मोफत ऑनलाईन एकूण चार बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन होणार आहे. पहिली टिंग टाँग – स्वराज्य फाउंडेशन चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा 20 जुलै रोजी होणार असून टॉप-10 विजेत्यांना रोख पुरस्कार दिले जातील. अशा प्रकारे एकूण तीन स्पर्धा 12 ऑगस्टपर्यंत रंगणार असून त्यामधील विजेत्या-उपविजेत्यांची चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ही चौथी स्पर्धा 14 व 15 ऑगस्ट रोजी होईल. त्यात अखिल हिंदुस्थानी व मुंबई स्तरावर टॉप-3 ठरणाऱया विजेत्यांना रोख पुरस्काराने गौरविण्यात येईल.

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने दुसरी स्पर्धा 1 ऑगस्टला तर तिसरी स्पर्धा 12 ऑगस्टला होणार आहे. प्रत्येक स्पर्धा साखळी 9 फेऱयांमध्ये ऑनलाईन लिचेस प्लॅटफॉर्मवर खेळविण्यात येऊन प्रत्येक सामने पाच-पाच मिनिटांचे असतील. कोरोना निर्बंधांमुळे सर्व स्पर्धा ऑनलाईन होणार असून शालेय खेळाडूंनी प्रामाणिकपणे खेळून स्पर्धेचा आनंद लुटण्याचे आवाहन संघटन समितीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते व सहसचिव उदय पवार यांनी केले आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱया स्पर्धकांनी प्रवेशासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण किंवा अरेना इंटरनॅशनल मास्टर व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेव्रेटरी राजाबाबू गजेंगी (93247 19299 व्हॉट्सअॅप) यांच्याशी 19 जुलैपर्यंत संपर्क साधावा.