
शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाङ्गी परिवहन कार्यालयात लावाव्या लागणाऱया लांबच लांब रांगा, दलालांचा ससेमिरा यातून आता सुटका होणार आहे. आता लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्थात शिकाऊ वाहन परवाना ऑनलाइन मिळणार असून नवीन गाडय़ांची नोंदणीही ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यामुळे परिवहन विभागाची 100 कोटींची बचत होणार असून 200 अधिकारीही कामाच्या ताणातून मुक्त होणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आला.
‘सारथी 4.0’ अंतर्गत आधार क्रमांकांशी संलग्न असलेल्या ऑनलाईन शिकाऊ वाहनचालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ङ्खाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्तम सेवा महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जावा तसेच सुरक्षित प्रवासाबरोबर सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरूपात देऊन त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम कसे वाचवता येतील यासाङ्गीही प्रयत्न केले जावेत. वेगवान आणि पारदर्शी सेवा उपलब्ध करून देताना विभागाने सुरिक्षित परिवहन सेवेला प्राधान्य द्यावे. ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करावा.
कार्यक्रमास परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, एनआयसी, नवी दिल्लीच्या महासंचालक डॉ. नीता वर्मा, मुख्यमंत्र्यांचे तसेच विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱहाड, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांच्यासह राज्यातील परिवहन विभागाचे अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
अशी होणार ऑनलाइन नोंदणी
शिकाऊ वाहन परवाना मिळवण्यासाङ्गी आता कार्यालयात जाण्याची गरज नाही. नवीन वाहन नोंदणीकरिता यापूर्वी वाहनांची तपासणी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत करण्यात येत होती आता अशा पद्धतीने वाहन तपासण्याची आवश्यकता काढून टाकण्यात आली असून यापुढे नवीन वाहनांची वितरकाच्या स्तरावर तत्काळ नोंदणी होईल. वाहन वितरकांमार्फत सर्व कागदपत्रे डीएससी (डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) चा उपयोग करून ई स्वाक्षरी पद्धतीने तयार करण्यात येतील त्यामुळे कार्यालयात वाहन अथवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. वाहन वितरकांनी कर व शुल्क भरल्याक्षणी वाहन क्रमांक जारी होणार आहे. अशी माहितीही त्यांनी दिली. परिवहन आयुक्त ढाकणे यांनी ज्या सेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देणे शक्य आहे त्या येत्या दोन महिन्यात उपलब्ध करून दिल्या जातील, असे आभार प्रदर्शनात सांगितले.





























































