महाराष्ट्राच्या रणरागिणीचं राम कदम यांना ओपन चॅलेंज, सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा

सामना ऑनलाईन । मुंबई

गोविंदांचे थरावर थर रचले जात असताना बेताल बडबड करून भाजपचे आमदार राम कदम यांनी अत्यंत खालचा थर गाठला. ‘तुमच्या पसंतीची मुलगी सांगा; पळवून आणणार आणि देणार!‘, अशी भाषा करणाऱ्या राम कदम यांना पुण्यातल्या मिनाक्षी डिंबळे पाटील या रणरागिणीने ओपन चॅलेंज दिलं आहे. मिनाक्षी यांनी राम कदम यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तिला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

पाहा व्हिडीओ:

वाचा बातमी: नाव ‘राम’ पण वर्तणूक ‘रावणा’ची, भाजप आमदाराच्या विधानावर नेटकऱ्यांची सडकून टीका