
ऑपरेशन सिंदूरनंतर आता सीमाभागातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाकिस्तानने गुरुवारी रात्रीपासून हिंदुस्थानच्या सीमावर्ती भागांमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र हिंदुस्थानने पाकड्यांचे सर्व ड्रोन व दोन विमानं पाडली. या सगळ्या घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पतंप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे.