Operation Sindoor: दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त, ही आहे कॅम्प्सची यादी

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर हल्ले केले. यात जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचे कॅम्प उद्ध्वस्त झाले आहेत.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने या नऊ जागांवर असलेल्या दहशतवादी कॅम्प्सची नावे जाहीर केली आहेत.

ही आहे यादी –

1 मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर – जैश ए मोहम्मद
2. मरकज तैयबा, मुरीदके – लश्कर ए तोयबा
3. सरजल, तेहरा कलान – जैश ए मोहम्मद
4. मेहमूना जोया, सियालकोट – हिजबूल मुजाहिद्दीन
5. मरकज अहले हदीस, बर्नाला – लश्कर ए तोयबा
6. मरकज अब्बास, कोटली – जैश ए मोहम्मद
7. मस्कर राहील शाहिद, कोटली – हिजबूल मुजाहिद्दीन
8. शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद – लश्कर ए तोयबा
9. सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद – जैश ए मोहम्मद

हल्ला झाल्याची पाकची कबूली

या हल्ल्यात पाकिस्तानी सैनाच्या कुठल्याही ठिकाणांवर हल्ला केला गेला नाही. या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानी सैन्यानेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानच्या 6 ठिकाणी 24 हल्ले झाल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिली आहे. या हल्ल्यात 8 जणांचा मृत्यू 33 जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले.